ठाणे शहराचा कला व संस्कृतीशी असलेला आत्मीय संबंध पिढ्यान्पिढ्या पुढे येत आहे. नाटक, चित्रकला, शिल्पकला व लोककला या विविध कलापरंपरा येथे जोपासल्या गेल्या असून, ठाणे कलाभवन, गडकरी रंगायतन तसेच विविध सांस्कृतिक सभागृहे या माध्यमातून ठाण्याची सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ झाली आहे. या सांस्कृतिक वारशाला पुढे नेत, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठाण्यात एक विशेष उपक्रम ठाण्यात रंगला.

कला व संस्कृतीला वाहिलेल्या ठाणे शहरात, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्टोक्स आर्ट स्टुडिओतर्फे “Colors4I’s” चित्रकला स्पर्धेचे आयोजन १५ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, ठाणे (प.) येथे करण्यात आले. “Colors4I’s – India. Inspire. Involve. Impact” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत ३६ कलाकारांनी सहभाग घेऊन आपल्या सृजनातून देशभक्ती आणि सामाजिक भावनांचे दर्शन घडविले. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर विजेत्यांचा विशेष गौरवचिन्हांनी गौरव करण्यात आला.
अक्षयशक्ती वेल्फेअर असोसिएशन, नमस्ते इंडिया इंटरनॅशनल, आर्टियॉन कम्युनिकेशन्स, इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि अन्विका आर्ट्स या प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण (आयपीएस) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांनी उपक्रमामागील सामाजिक हेतूसोबतच कलाकारांच्या उत्साही सहभागाचेही मनापासून कौतुक केले.
श्री. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीबरोबरच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. यात श्री. आशिष मोरे (जी.एम., रेमंड लिमिटेड – ठाणे), सौ. कविता किशोर (संस्थापक – KJM ड्रीम्झ एंटरटेनमेंट), ॲड. स्वप्नाली (फाउंडर डायरेक्टर – आर्टियॉन कम्युनिकेशन्स प्रा. लि.), कर्नल वेणु माधव गल्लाकोटा, कर्नल वेंकट रमन, श्री. गिरीश रामकृष्ण (विश्वस्त – इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन), डॉ. रेवती श्रीनिवासन (डायरेक्टर एज्युकेशन व ग्रुप डीन – सिंगानिया ग्रुप ऑफ स्कूल्स), श्री. निखिल बल्लाळ (मॅनेजिंग एडिटर – ठाणे वैभव), तसेच डॉ. सुचित्रा केळकर (फिजिशियन – बेथनी हॉस्पिटल, ठाणे) यांचा समावेश होता.
गेल्या पंधरा वर्षांपासून अक्षयशक्ती वेल्फेअर असोसिएशनने आरोग्य, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत प्रभावी उपक्रम राबवत समाजहिताची दिशा ठरवली आहे. नमस्ते इंडिया इंटरनॅशनल आणि आर्टियॉन ही व्यासपीठे भारतीय कला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी योगदान देत आहेत. अन्विका आर्ट्स विविध कलाविष्कारांना पाठबळ देते, तर इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन १९८५ पासून समाजातील वंचित घटकांसाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.
स्पर्धेनंतर १५ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘फ्रीडम आर्ट एक्झिबिशन’ या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील २४ प्रतिभावान कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित झाली आणि रसिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला. या प्रदर्शनाच्या आयोजन समितीत सुश्री मिनी सुबोथ (संस्थापिका – अक्षयशक्ती वेल्फेअर असोसिएशन व स्ट्रोक्स आर्ट स्टुडिओ), श्री. नरेंद्र लिंडाईत (संस्थापक – आर्टियॉन), डॉ. नारायण बी. अय्यर (मुख्य कार्यकारी अधिकारी – अक्षयशक्ती वेल्फेअर असोसिएशन) तसेच श्री. सुधीर साळुंखे (संस्थापक – नमस्ते इंडिया ग्रुप) यांचा सक्रीय सहभाग लक्षणीय ठरला.
‘फ्रीडम आर्ट एक्झिबिशन’ मध्ये विविध पिढ्यांचे व शैलींचे कलाकार एकत्रित आले.
वेंकट अय्यर, रुमी नंदी, मिनी सुबोथ, सुचेता जाधव, डॉ. रेनुका परमार, धन्यलक्ष्मी नायर, शीतल दिदवानिया, सुजाता चौहान, वर्टिका भाला, इंदिरा चंद्रशेखरन, आर्या डोंगरे, अद्वेता प्रधान, मन्जु साध, श्रावरी भावे, सारिका वाघ, ऋशु जायसवाल, माधुरी बेन्दले, नीना जाधव, उमा कुलकर्णी, आर्या डोंगरे, सलोनी अशेर, वैशाली मोरे, स्मिता भामरे, आरिका महाराज, सिमरन सिंग, शिल्पा तायशेटये, दिलवीन कौर बुमराह, सुनील डोडेजा, डॉ. सुचित्रा केळकर, मुरलीधर डबाडे, डॉ. रेवती श्रीनिवासन, रमेश व्ही. देशमाने, बिल्किस ए. रेशमवाला, शबनम आय. रेशमवाला आणि सुधीर एस. साळुंखे यांसह अनेक कलाकारांची कलाकृती रसिकांसमोर प्रदर्शित झाली.
भारतीय कला आणि संस्कृती ही आज केवळ काही निवडकांच्या अभिरुचीपुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. परंतु या परंपरेचे संवर्धन व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने होणारे उपक्रम अत्यावश्यक ठरतात. ठाण्याच्या कलासंपन्न परंपरेला पुढे नेणाऱ्या या स्पर्धा व प्रदर्शनाने स्वातंत्र्याच्या संकल्पनेला नव्या अभिव्यक्तीतून साकार करताना, कला ही केवळ सौंदर्यदृष्टीची अभिव्यक्ती नसून सामाजिक परिवर्तनाचे साधनही ठरते, हा महत्त्वपूर्ण संदेश ‘कलर्स फॉर आयएस’ आणि ‘फ्रीडम आर्ट एक्झिबिशन’ ने अधोरेखित केला.